Breaking: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवर भीषण अपघात; दोन जण ठार

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

परिसरात पुन्हा एक भीषण अपघात झाला असून खासगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. आज (दि.११ मार्च) सकाळी ही घटना घडली आहे. देवदर्शनाहून परतताना हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेलगाव ढगा परिसरात ही घटना घडली आहे.

दरम्यान, खासगी वाहतूक करणारी बस (MH 47 AS 4848) प्रवाशांनी भरलेली होती. त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून निघाल्यानंतर नाशिककडे मार्गक्रमण करीत होती. अशातच बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुल जवळ आली असता टायर फुटले. बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये आली. यामुळे नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक देत झाडावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दुचाकीवरील जखमींना तातडीने जवळच्या दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.