पीएम मोदींनी उद्घाटन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा सहाव्याच दिवशी अपघात…

0

 

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क:

१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी हिरवा कंदील (green signel) दाखवल्यानंतर रेल्वेच्या (Railway) सेवेत दाखल झालेली गांधीनगरहून मुंबईला (Gandhinagar to Mumbai) येत असताना काही जनावरे लोहमार्गात आडवी आल्याने गुजरातमधील मनीनगर याठिकाणी “वंदे भारत एक्स्प्रेसला” अपघात झाला आहे. या अपघातात “वंदे भारत एक्स्प्रेस” रेल्वेच्या समोरील भागाचं नुकसान झालं आहे. या रेल्वेच्या समोरील भागाचं नुकसान झालं असल्याचे वृत्त आहे. मात्र, रेल्वे सेवेवर कोणाताही परिणाम झाला नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ही मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी सेमी हायस्पीड रेल्वे आहे. ही रेल्वे २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. यामुळे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास प्रवाशांसाठी सुकर ठरतो. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वटवा ते मनीनगर दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.