यावल येथे कोळी समाज बांधवांची बैठक

0

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

आद्य कवी महर्षि वाल्मीक जंयती साजरी करण्यासाठी यावल तालुक्यातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची महत्त्वाची बैठक दि. ९ ऑक्टोबर रविवारी रोजी १२ वाजता जिंनिग प्रेस सभागृहात संदिपभैय्या सोनवणे सरपंच वढोदा प्र. यावल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

महर्षि वाल्मीक जयंती साजरी करणे, मोटार सायकल रॅली काढणे, समाजातील उकृष्ट काम करणाऱ्या समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी सत्कार, सेवानिवृत सैनिकांचा सत्कार, विविध पुरस्कार मिळालेल्या महिला व पुरुष यांचा गौरव करणे यासह विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

तरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यावल एस.टी.आगारातील कर्मचारी बांधव, विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्यासह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदुभाऊ सोनवणे रीधुरी, विकास सोळके कोळन्हावी, खेमचंद कोळी पाडळसा, राहुल तायडे बामणोद, गजानन कोळी पीप्री, प्रदिप कोळी भालोद, समाधान सोनवणे थोरगव्हाण, प्रमोद कोळी शिरसाड, गोटुभाऊ सोनवणे शिरसाड, प्रतापदादा सोनवणे पथराडे, बबलुभाऊ कोळी किनगाव, किरण कोळी दहिगाव, गोकुळ कोळी मनवेल, संदिप कोळी बोरावल, मोहनभाऊ सपकाळे पीप्री, अनिल कोळी साकळी, रतनभाऊ कोळी भालशिव, चिंधू तावडे, मुकुंदा कोळी, नामदेव कोळी, वासुदेव कोळी, बापु तायडे पाडळसे, जितेंद्र कोळी भालोद, शरद कोळी, अमर कोळी, जालंधर कोळी, भरत कोळी, सुनिल नन्नवरे यावल, योगेश कोळी अट्रावल, भगवान कोळी विरोदा यांच्यासह समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.