जिल्हा आरोग्य अधिकारी यांची धामणगाव आरोग्य केंद्रास भेट

0

धामणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि. ४ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांनी धामणगाव प्रा. आ. केंद्रास व ममुराबाद आरोग्य उपकेंद्रात सुरु असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित कार्यक्रमास भेट दिली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले, डॉ. अजय सपकाळ, सी. एच. ओ. डॉ. अश्विनी विसावे, पी. ओ. प्रियंका मंडावरे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, आरोग्य सहायिका प्रतिभा चौधरी, कनिष्ठ सहाय्यक महेश वाणी, आरोग्य सेवक घनश्याम लोखंडे, आरोग्य सेविका वैशाली सपकाळे, बबीता करोशिया, जयश्री कंखरे, गट प्रवर्तक, आशा सेविका व संपूर्ण कर्मचारी वृंद उपस्थित होते.

सदर भेटी दरम्यान त्यांनी डिलिव्हरी रूम, हिरकणी कक्ष, आय एल आर (लस साठा), आणि औषधी भांडार गृह यांची पहाणी केली. बाह्य रुग्ण तपासणीस आलेल्या नागरिकांशी दिल्या जाणाऱ्या सेवा बाबत चर्चा केली आणि अंतर्गत व परिसर स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले. तसेच कोविड लसीकरणात धामणगाव प्रा. आ. केंद्राचे काम जिल्ह्यात सर्वात चांगले असल्याने ता. आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, धामणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले व डॉ. अजय सपकाळ व संपूर्ण स्टॉपचे अभिनंदन केले.

नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेअंतर्गत संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने व क्षयरोग व कुष्ठरोग औषधोपचारिक रुग्ण यांचा तर आता सुरु असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित कार्यक्रमाचा, अनेमिया मुक्त भारत, आरोग्य केंद्रातील व उपकेंद्रातील प्रसूती वाढवणे, एन सी डी व सर्व राष्ट्रीय कार्यक्रम आदी विषयाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या व दप्तर तपासणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.