Monday, January 30, 2023

जळगावच्या महिलेवर बिहारमध्ये अत्याचार; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेला परराज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) एकाविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील २९ वर्षीय महिला ही जळगाव शहरातील एका राहते. पतीसोबत कौटुंबिक वाद असल्याने ती औरंगाबाद येथून जळगाव शहरात रहायला आली होती. महिलेची राजेश कुमार जयनारायण पासवान रा. संतौर, सहरसा नारायणपूर, बिहार यांच्याशी ओळख निर्माण झाली. राजेशकुमार याने महिलेशी जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला.

- Advertisement -

दि. ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान बिहार (Bihar) राज्यात त्याच्या गावाला घेवून गेला. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणालाही सांगू नको अशी धमकी दिली. बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी महिला जळगावात आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता संशयित आरोपी राजेशकुमार जयनारायण पासवान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे