वाळू व्यावसायिकाला ५० हजारांची खंडणी मागून कोयत्याने केला हल्ला

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

वाळू वाहतूकदारास पन्नास हजाराची खंडणी मागण्यासह कोयत्याने हल्ला करुन  जखमी करणा-या कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार असे पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी असलेल्या कथित आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.

हेमंत मच्छींद्र पवार हा पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील विस वर्षाचा तरुण वाळूचे ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतो. तु वाळूचे ट्रॅक्टर चालवतो म्हणून पारोळा पोलिस स्टेशनला तुझ्याविरुद्ध अर्ज केले असल्याचे राहुल सरदार याने हेमंत पवार याला म्हटले. तु जर मला पन्नास हजार रुपये दिले तर तुझ्याविरुद्धचे दोन्ही अर्ज मागे घेतो आणि जर नाही दिले तर तुझ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी आपणास राहुल सरदार याने दिली असल्याचे हेमंत पवार याने फिर्यादीत म्हटले आहे. मी आरटीआय कार्यकर्ता असून काहीही करु शकतो असे म्हणत राहुल सरदार याने हेमंत पवार याला पैशांची मागणी केली.त्यामुळे पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.