महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी, चौकाचे नामकरण व फलक अनावरण

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शहरात क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.11 रोजी सकाळीं 10 वाजता गुरुदत्त चौक खोल गल्ली, शनी चौक, नवनाथ बाबा मंदिराजवळ क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमा प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर सायंकाळी तहसील कार्यालय समोरील चौकाला क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक नामकरण फलक अनावरण व मिरवणूक पूजन करण्यात आले. या वेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, बापुजी युवा फाऊंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटिल, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, रितेश महाजन आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅकर रथावर सवाद्य मिरवणूक निघाली. जय ज्योती जय क्रांती च्या घोषणा देत विविध गीतांच्या तालावर समाज बांधवांनी ठेका धरला व जल्लोष केला. शहरातील रथ मार्गाने ही मिरवणूक निघून समारोप महात्मा फुले चौकात करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.