ट्रक परस्पर विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव : ट्र्क मालक तरुणाच्या मालकीच्या दोन्ही ट्रक परस्पर विकून दुस-याच्या नावे करणा-या आरटीओ एजंटसह दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास सिताराम राठोड (रा. लक्ष्मीनारायण नगर सावदा ता. रावेर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ब्रिजेशकुमार प्रकाश यादव ( रा. स्वामीनारायण नगर सावदा – रावेर) आणि शहादत अली यासीन अली (आरटीओ एजंट रा. फैजपूर ता. यावल) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. जळगाव आरटीओ कार्यालयात घडलेल्या या घटने प्रकरणी देवीदास राठोड या तरुणाने रामानंद नगर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.