अवकाळीचा कहर; घराची भिंत कोसळून २ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू…

0

 

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तांडव सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही चिंताग्रस्त आहेत. अश्यातच बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पासवसाने एका २ वर्षीय चिमुरडीचा बळी घेतला आहे. पावसामुळे भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या २ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या काटेल गावात ही घटना घडली. यात आणखी एक मुलगी किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या काटेल गावात दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यावेळी एका कच्च्या घराची भिंत कोसळली. यात २ वर्षांची कृष्णाली भिंतीखाली दबली गेल्याने गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर आणखी एक मुलगी किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज दुपारपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Leave A Reply

Your email address will not be published.