मलकापूर शहरात सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात कचऱ्याला आग…

0

 

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या आवारातील कचऱ्याला अचानक आग लागली, या आगीत परिसरातील संपूर्ण कचरा जळून खाक झाला. तर लागलेल्या आगीची माहिती परिसरातील व्यवसायिकांना कळताच व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद करून तात्काळ आग विझविण्याचे प्रयत्न करित न.प‌ च्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांना लागलेल्या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात यश आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात रस्त्यावर फळ विक्रेते तसेच व्यवसायिक आपल्या दुकानातील कचरा या परिसरात टाकत असतात. या व्यावसायिकांकडून या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो दि.06 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान कचऱ्याला अचानक आग लागली. तर लागलेल्या आगीत परिसरातील संपूर्ण कचरा जळून खाक झाला. यावेळी परिसरातील व्यवसायिकांच्या आग लागल्याचे कळताच नगर पालिकेच्या अग्निशामक दलाला सूचना दिली, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचे कार्य सुरू केले. थोड्या वेळात आग आटोक्यात आली. यामध्ये सुदैवाने मोठी हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र सार्वजनिक वाचनालयाच्या परिसरात अशा प्रकारे गेल्या पंधरा दिवसांमध्ये पाच ते सहा वेळेस आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले, भविष्यात अशा प्रकारे पुन्हा आग लागल्याने मोठी दुर्घटना घडु शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.