उद्धव ठाकरेंसह राज्यातील बड्या नेत्यांना श्री राम मंदिर लोकार्पण सोहळाचे निमंत्रण…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळाच्या निमंत्रणावरून गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरु होती. ज्यामुळे निमंत्रणावरून दावे प्रतिदावे करण्याचा खेळ सुरु होता. मात्र आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना श्री राम मंदिर न्यासकडून निमंत्रण प्राप्त झाले आहे. नवीन वर्षात अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री राम मंदिर न्यासकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.