उद्धव ठाकरेंची सभा विराट व लक्षवेधी होणार – अंबादास दानवे

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची २३ एप्रिल रोजी पाचोऱ्यात महासभा आयोजित करण्यात आली असून ही सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत विराट व लक्षवेधी ठरणार आहे. अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २१ एप्रिल रोजी शहरातील “शिवतिर्थ” या उबाठा शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख सुनिल पाटील, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, विष्णु भंगाळे, वैशाली सुर्यवंशी, छत्रपती संभाजी नगर जिल्हाप्रमुख राजु राठोड, अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पु राजपुत, अतुल चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत वैशाली सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची रुपरेषा विषद केली. यात २३ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता उद्धव ठाकरे यांचे जळगांव विमानतळावर आगमन व स्वागत, १२:४० वाजता पाचोऱ्याकडे प्रस्थान, दुपारी १:४० वाजता पाचोऱ्यातील वरखेडी नाक्यावर आगमन, वरखेडी नाका ते महाराणा प्रताप चौकापर्यंत उबाठा शिवसेना व युवासेना आयोजित ढोल ताशांच्या गजरात मोटरसायकल रॅली, दुपारी १:४५ वाजता महाराणा प्रताप चौकात उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जनतेची घेतलेली काळजी ज्या कार्याची जगाने दखल घेतली त्याबद्दल पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या वतीने जाहीर स्वागत, दुपारी १:५० ते ३:३५ पर्यंत निर्मल विश्रामगृहात आगमन व भोजन व आराम, ३:३५ ते ३:४५ निर्मल सिड्स येथील लॅबचे उद्घाटन, ३:४५ ते ५ वाजेपर्यंत निर्मल सिड्स येथे जैव तंत्रज्ञान प्रयोग शाळेत स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या आठवणींना उजाळा, ५:०५ वाजता प्रयोग शाळेचे उद्घाटन, ५:१० वाजता पुतळा अनावरण (निर्मल सिड्स), ५:१५ वाजता निर्मल स्कुलमध्ये पुतळा अनावरण, ५:३० वाजता जयकिरण धाम लाख भेट व निर्मल विश्रामगृहाकडे प्रस्थान व निर्मल विश्रामगृहावरुन सोयीनुसार सभास्थळी प्रस्थान व सभा आटोपल्यानंतर जळगांव विमानतळाकडे प्रस्थान, रात्री १० वाजता जळगांव ते मुंबई विमानाने प्रवास अशी माहिती वैशाली सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मी आमंत्रण दिले आहे येणे न येणे हा त्यांचे वैयक्तिक मत – वैशाली सुर्यवंशी

२३ एप्रिल रोजी राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी व प्रयोग शाळेच्या उद्घाटनासाठी येत आहेत. माझे बंधु आ. किशोर पाटील यांना मी आमंत्रित केले असुन यावेळी येणे न येणे हा त्यांचा वैयक्तिक विषय असुन मी माझे काम केले आहे. मात्र आ. किशोर पाटील यांनी या आधीच स्पष्ट केले आहे की, २४ एप्रिल रोजी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह निर्मल सिड्स व निर्मल स्कुल मध्ये जावुन स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.