मलकापूर सशस्त्र हाणामारी प्रकरण… एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील ताजनगरातील सशस्त्र हाणामारी प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी वरुन तब्बल २० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आज दुपारी अकोला येथे उपचारादरम्यान मो. शरीफ मो.रज्जाक वय 25 याचा मृत्यू झाला आहे. दोन्ही गटातील १३ जणांना अटक करुन गजाआड करण्यात आले आहे. चाकूच्या हल्ल्यात दुसरा जखमीचीही गंभीर आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, काल बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास विजेच्या खांबावरुन पारपेठ प्रभागातील ताजनगरात शेजारी शेजारी वास्तव्य करणाऱ्या दोन गटात वाद उफाळून आला. नंतर शाब्दिक चकमक झाली त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. एका गटाच्या वतीने दुसऱ्या गटातील लोकांवर चाकूने हल्ला चढवला त्यात पाच जण गंभीर जखमी झाले होते.

या प्रकरणी, राजमोहम्मद अ.रशिद रा‌.ताजनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शाहरुखखान मुनिरखान ,जावेदखान मुनिरखान,मुनिरखान नूरखान,हमीदखान मेहमूदखान,अक्रमखान मुनिरखान,कलीमखान असलमखान अशा सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चौघांना अटक करून गजाआड करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके करीत आहेत.

विरोधी गटाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अ‌.रज्जाक अ.समद,अ.साबीर अ.रज्जाक ,राजमोहम्मद अ.रशिद,अ.कलीम अ.समद, अ.युसूफ अ.रशिद, अ.हनिफ अ.हजीज, शे.मोबीन शे.नबू, अ.आसीफ अ.रज्जाक, अ‌.अलीम अ.कलीम व इतर ५ अशा १४ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एकूण ९ जणांना अटक करुन पोलिसांनी गजाआड केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्रसिंह ठाकूर करीत आहेत.

दरम्यान काल बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पारपेठ प्रभागात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही गटातील लोकांना सशस्त्र हाणामारीत जखमा झाल्याच उघडकीस आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर ढवळून निघाला आहे. शेजारी शेजारी असलेल्या दोन गटात वाद उफाळून आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी जातीने या प्रकरणी लक्ष घालून आहे. गुन्ह्यात कलम 302 ची वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान ताजनगरातील सशस्त्र हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी मोहम्मद आरिफ अ.रज्जाक याचेवर अकोला येथे उपचार सुरू असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.