उद्धव ठाकरे करणार मोठे गौप्यस्फोट! नेमका काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

येत्या दिवसात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ आणि २७ जुलै रोजी ही मुलाखत प्रसारित होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) सुरु करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत प्रसारित होणार आहे. दरम्यान नुकतेच या मुलाखतीचा टिझर समोर आला आहे.

उद्धव ठाकरे बोलणार तरी काय?
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठरे या मुलाखतीत त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट, अजित पवार यांचा शपथविधी, महाविकास आघाडीचं भवितव्य तसेच काँग्रेससोबत जात ‘इंडिया’ आघाडीत घेतलेला सहभाग या सर्व मुद्यांवर उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत तंट्या २६ आणि २७ जुलै रोजी दोन भागात प्रसिद्ध होणार आहे.

या टीझरमध्ये आवाज कुणाचा, वर्षातील सर्वात मोठा, स्फोटक आणि थेट भाग लवकरच अशी अक्षरे आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत एकमेकांसमोर बसलेला फोटो या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. संपूर्ण डिटेलसह हा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

पॉडकास्ट कशासाठी?
‘आवाज कुणाचा’ अशा नावाने उद्धव ठाकरे गटाकडून पॉडकास्ट सुरू करण्यात आलं आहे. शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि विविध राजकीय विषयांवर चर्चांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार आहे. पहिल्याच भागात उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत घेतांना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये सध्या पॉडकास्ट हा प्रकार लोकप्रिय असल्यानं याच्या माध्यामातून तरुण वर्गाला अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला याठिकाणी केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.