राजकारणात मोठा ट्विस्ट, संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीतून मोठी ऑफर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहे. असं असतांना आता महाविकास आघाडीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी खरी ठरली तर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण ही बातमीच अगदी तशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत खूप मोठी बातमी समोर येताना दिसत आहे. सूत्रांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीत सहभागी झाले तर त्यांना लोकसभा निवसणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी एक अट असणार आहे. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीच्या ३ प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करावा लागणार आहे. संभाजीराजेंनी ३ पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संभाजीराजेंना आपला पक्ष विलीन करावा लागणार?
संभाजीराजे यांनी आता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवाडी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात, ठाकरे गटात किंवा काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आणि त्यांच्या स्वराज्य पक्ष त्या पक्षात विलीन केला तर, त्यांना उमेदवारी निश्चित मिळू शकते. अशी माहिती सूत्रांमध्ये मिळत आहे. महाविकास आघाडीतील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचदेखील याबाबत एकमत झालेलं आहे. संभाजीराजे यांना कोल्हापूरची जागा दिली जाऊ शकते, अशीदेखील माहिती समोर येत आहे. विशेष संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांचेदेखील नाव यासाठी चर्चेत होत. त्यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी चर्चेत होतं. त्यानंतर आता संभाजीराजे यांच्याबाबतची नवी माहिती समोर आली आहे. संभाजीराजे याबाबत काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.