ट्विटरचा लोगो बदलला ! निळ्या चिमणीच्या जागी आला DOGE

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

एलन मस्क ( Elon Musk ) यांनी मंगळवारी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर मोठा बदल केला. त्यांनी ट्विटरचा लोगो बदलला. ट्विटरने ब्ल्यू चिमणी काढून त्याजागी आता Doge (डॉगी) कुत्र्याचा लोगो लावला आहे. मस्क यांनी एका युजरला ट्विटमध्ये सांगितले की, त्यांनी जे वचन दिले होते ते पूर्ण केले.अमेरिकन अब्जाधीश मस्क यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतले. यानंतर अनेक मोठ्या निर्णयांमुळे मस्क चर्चेत राहिले. यामध्ये ब्ल्यू टिकचे शुल्क, कर्मचाऱ्यांची छाटणी, सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी यांचा समावेश होता.

ट्विटरचा लोगो बदलताच युजर्स आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी एकमेकांना या बदलाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. एका युजरने विचारले, प्रत्येकाला लोगोवर डॉग दिसत आहे का? काही वेळातच #DOGE ने ट्विटरवर ट्विट करायला सुरुवात केली. युजर्सला वाटले की कोणीतरी ट्विटर हॅक केले आहे. त्यानंतर काही वेळातच एलन मस्क यांनी एक ट्विट केले, ज्यामध्ये ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.