आयपीएलवर कोरोनाचे ग्रहण, मेंटेटर आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

कोरोनाने (Corona) पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढताना दिसत असून आता आयपीएल (IPL) वर कोरोनाचे ग्रहण लागले आहे. दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्रा (Akash Chopra) यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरु असलेल्या आयपीएलवर कोरोनाचे सावट पसरले आहे. आकाश चोप्राने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. कोरोनाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला आहे. सौम्य लक्षणे जाणवले आहेत. काही दिवस मी कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही. घसा खराब झाल्याने आवजाचा लोचा होऊ शकतो. असं चोप्राने ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आकाश चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल 2023 च्या सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही. आकाश चोप्रा आयपीएलमध्ये जिओ सिनेमासाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री करत आहे. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये लिहिले, व्यत्ययाबद्दल क्षमस्व. कोविडने माझ्यावर पुन्हा एकादा हल्ला केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.