मेरी कोम (मुष्टियुद्ध)

0

लोकशाही, विशेष लेख

मेरी कोम (Mary Kom) यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९८२ रोजी मणिपूर (Manipur) जवळील कंग्थेथेई या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव मांगते चुंगनेजंग मेरी कोम असे आहे. मात्र त्या एम. सी. मेरी कोम या नावानेच जगप्रसिद्ध आहेत. त्यांना ‘आयर्न लेडी’ (The Iron Lady) म्हणून देखील ओळखले जाते. मणिपुरी बॉक्सर डिंको सिंगने बँकॉकच्या आशियाई स्पर्धात सुवर्ण पदक (Gold medal) जिंकले आणि तेथेच प्रेरित होऊन त्या या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित झाल्या. घरच्यांचा विरोध असतानाही २००० साली त्यांनी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पाय ठेवला आणि आपल्या अखंड मेहनतीच्या जोरावर त्याच वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेची बातमी वृत्तपत्रात आल्यावरच घरच्यांना आपली मुलगी बॉक्सिंग खेळते हे समजले.

त्यांनी सहा वेळा जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विजयी होण्याचा भीमपराक्रम केला असून अशा करणाऱ्या त्या एकमेव आहेत. त्यापैकी शेवटची दोन पदके आणि ऑलिम्पिक पदक हे त्यांनी आई झाल्यावर जिंकलेले आहे हे विशेष. त्याच प्रमाणे त्यांनी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये (Olympics) कांस्य पदक जिंकले आहे. हे यश संपादन करणाऱ्या त्या एकमेव भारतीय बॉक्सर आहेत. राष्ट्रीय (National) आणि आंतरराष्ट्रीय (International) पदकांसह, मेरी कोम यांना २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), २००६ मध्ये पद्मश्री (Padmashri), २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna), २०१३ मध्ये पद्मभूषण (Padma Bhushan) आणि २०२० मध्ये पद्मविभूषणने (Padma Vibhushan) सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी
संपर्क- ७५८८९३१९९२

Leave A Reply

Your email address will not be published.