ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत तुषार महाजन जिल्ह्यात प्रथम

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क 

येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक राकेश चिंधू महाजन (रा. किनगाव)  यांचा मुलगा चि. तुषार राकेश महाजन (इ. ३ री) याने ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व राज्यात २२ वा क्रमांक मिळवून तो गोल्ड मेडलचा मानकरी ठरला.  या यशाबद्दल नुकतेच जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था जळगाव यांच्या  वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत पाल्य म्हणून तुषार राकेश महाजन याला स्मृतीचिन्ह व रोख पारितोषिक देऊन पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष एम. बी. तडवी व संचालक मंडळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तुषार हा जानकीबाई लिमये प्राथमिक विद्यालय, पाली,जि. रायगड येथे शिक्षण घेत आहे.  तुषार राकेश महाजनला वर्गशिक्षिका सुप्रिया झोलगे मॅडम आणि त्याच्या आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.