लोकशाही न्यूज नेटवर्क
आयफोन १५ साठी सर्वच जण उत्सुक आहे. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली असून, त्याच्या खरेदीसाठी लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाली आहे. दिल्लीच्या कमला नगर मार्केटमध्ये हा वाद झाला आहे. दुकानदाराकडून ग्राहकाला मोबाईल देण्यास उशीर केल्यामुळे हा वाद झाला आहे. हा वाद बोलण्यातून इतका वाढत गेला की, मोबाईलच्या दुकानात हाणामारी सुरु झाली. त्यावेळी तिथे असलेल्या लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, ग्राहक आणि दुकानाचा चालक या दोघांमध्ये चांगलीच हाणामारी सुरु आहे. या दोघांचं भांडण पाहून तिथं लोक जमा झाली आहे. त्याचबरोबर त्यातली काही लोक हे भांडण सोडविण्यासाठी दुकानात घुसली आहे. या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनी दोघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आयफोन विक्रीला उशीर झाल्यामुळे दोघांच्या मध्ये तुफान राडा झाला आहे. व ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकमेकांना चांगलंच धुतल्याचे दिसत आहे.