तुळशीची माळ घातल्याने हे होतात फायदे ! वाचा माहिती

0

नवी दिल्ली ;-प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात तुळशीच रोप असतच आणि तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते. शास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मक वनस्पती मानली जाते . तुळशीचे रोप आणि तुळशीची माळ या दोन्हींना हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाच्या पूजेला जेवढ महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व तुळशीची माळ घालण्यालाही आहे.

यासोबतच त्या माळेने जप केल्यास ते खूप फलदायी ठरते. जे लोक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूचे उपासक आहेत ते त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नक्कीच घालतात. गळ्यात तुळशीची माळ घातल्याने मनाची शांती आणि आध्यात्मिक शुद्धता राहते, अशी श्रद्धा आहे.
तुळशीच्या माळेचे लाभ:

गळ्यात ही माळ धारण केल्या मुळे जीवन शक्‍तित वाढ होते,आणि अनेक रोगांन पासून मुक्ती मिळते.
तुळशीची माळ धारण केल्यानी अकाल मृत्‍यु आणि संक्रामक रोगां पासून मुक्‍ति मिळते आणि ही माळ धारण करणारा व्यक्ती आजार पणा पासून मुक्त होतो.
तुळशीच्या माळेच्या प्रभावानी मानसिक तनावात कमी येते आणि धारणकर्ताचा आवाज सुरीला बनतो.
ही माळ धारण करणाऱ्या व्‍यक्‍तिच्या स्वभावात सात्त्विकताचा संचार होतो.

याशिवाय ज्योतिष शास्त्रातही तुळशीच्या माळाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत असलेले बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

तुळशी शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असते, तरी ती घालण्याआधी ती गंगाजलाने शुद्ध करून आपल्या गळ्यात घालावी.

तुळशीची माळ गळ्यात घातल्याने कुंडलीत बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

तुळशीच्या माळेमुळे भगवान विष्णू, लक्ष्मी देवी आणि कृष्णाचा सतत आशीर्वाद मिळतो.

जे तुळशीची माळ घालतात त्यांनी नेहमी सात्विक भोजन करावे.

गळ्यात तुळशीची माळ घालणाऱ्यांनी ती कधीही काढू नये.

तुळशीच्या माळेवर जप करण्याचे नियम

– गळ्यात घालणारी आणि जपाची दोन्ही माळा वेगळ्या ठेवाव्या.

– जप केल्यानंतर तुळशीची माळ कापडात गुंडाळून ठेवावी.

तुळशी माळाचे प्रकार

तुळशीच्या माळांचे दोन प्रकार आहेत. एक श्यामा आणि दुसरी रामा तुळशी. या दोघांपासून तुळशीची माळ तयार केली जाते. श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने माणसाला मानसिक शांती आणि मनात सकारात्मक उर्जेची भावना येते. श्मामा तुळशीच्या माळामुळे आर्थिक लाभासोबतच देवाची कृपा प्राप्त होते.

Leave A Reply

Your email address will not be published.