मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीचा सण हरविला कुठे?

0

मकरसंक्रांत विशेष लेख

 

आज मकरसंक्रांतीचा सण आहे. परंतु मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीचा सण हा हरविला कुठे? जणु असेच वाटत आहे. ते असे की, पूर्वीच्या काळी मकरसंक्रांत सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र -मैत्रिणींना, नातेवाईकांना ‘तिळ-गुळ घ्या, गोड गोड बोला’, असे म्हणत एकमेकांना तिळ-गुळ देत असत. परंतु आजच्या २१ व्या शतकात, संगणकीय युगात तसेच मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीच्या दिवशी मोबाईल वरुनच ‘तिळ-गुळ घ्या, गोड गोड बोला ‘,अशा शुभेच्छा प्रत्येकजण एकमेकांना देतांना आपणांस दिसुन येत असतो.

त्याचप्रमाणे मोबाईलच्या दुनियेत मकरसंक्रांतीचे ग्रिटींग कार्ड, शुभेच्छा कार्ड हे देखील हरपत चाललेले आपल्याला दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी मित्र-मैत्रीण,नातेवाईक हे मकरसंक्रांतीला एकमेकांना ग्रिटींग कार्ड, शुभेच्छा कार्ड देत असत. तसेच पोस्टाच्या माध्यमातुन देखील पाठवित असत. परंतु आता हे ग्रिटींग कार्ड, शुभेच्छा कार्ड हे देखील नामशेष होतांना दिसून येत आहे.

पूर्वीच्या काळी मकरसंक्रांतीच्या दिवशी नातेवाईक, मित्र हे एकमेकांना ‘तिळ-गुळ’ देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन ‘तिळ-गुळ’ दिल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत असत. परंतु सध्याच्या मोबाईलच्या दुनियेत मात्र मकरसंक्रांतीच्या दिवशी नातेवाईक, मित्र यांना बरेचजण मोबाईल वरुनच तसेच व्हॉट्स अॅप च्या माध्यमातूनच एकमेकांना मकरसंक्रांतीचे संदेश, शुभेच्छा देतांना आपणांस दिसून येत आहे. अशा प्रकारामुळे माणुस हा माणसापासून दुरावत चालल्याचे चित्र देखील दिसून येत आहे. व यामुळे भविष्यात काय होऊ शकते याचा विचार केलेलाच बरा!!!

 

-हेमंत वसंतराव चौधरी, 

चाळीसगाव जि. जळगाव. 

मो. नं. :-९८९०७०३४८५

Leave A Reply

Your email address will not be published.