मुंबईतील काळाचौकी परिसरात सिलेंडरचा मोठा स्फोट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील काळाचौकी परिसरातल्या मुंबई नगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती समोर आली. तब्बल ६ ते ७ ऑक्सिजन सिलेंडर स्फोट झाला होता. स्फोटाने परिसरात नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं होत. फायर ब्रिग्रेडच्या चार गाड्या घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

नेमकी आग लागली कुठे?
बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कुलमध्ये आग लागली होती. कोविदमध्ये या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. मात्र त्या काळात वापरले गेलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते. यात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आतमध्ये असलेल्या गाद्यांनी पेट घेतला आणि आग वाढत गेली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.