इंडिगो फ्लाइटला उड्डाण करण्यास उशीर झाल्याने प्रवाशाने केले असे काही…. 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

बऱ्याचदा वातावरणात खूप जास्त बदल होतांना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याचदा उड्डाण करण्यास वेळ लागतो. त्यामुळे फ्लाईटला उशीर होतो. परिणामी याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. असाच त्रास रविवारी इंडिगोच्या दिल्ली-गोवा फ्लाईटच्या प्रवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे रंगाच्या भारत एका प्रवाशाने चक्क पायलटवरच हात उगारला. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

हवामानातील बदलामुळे इंडिगो विमानास उड्डाण करण्यास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना तब्बल १३ तास विमानात अडकून राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी खूप जास्त संताप व्यक्त केला. त्यात रागात येउन एका प्रवाशाने पायलटच्या चक्क कानाखाली मारली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

ही घटना दिल्ली विमानतळावर घडली आहे. या प्रकरणी एव्हिएशन सिक्युरीची एजन्सीने तपास सुरु केला होता. तर इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या फ्लाईटला उशीर झाल्याची माहिती पायलट देत होता. त्याचवेळीस प्रवाशाने पायलटला मारहाण केली.

साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. त्यानेच पायलटला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील हवामानबदलामुळे आणि दाट धुक्यांमुळे विमानाचे उड्डाण होणे शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत तब्बल ११०  फ्लाइट्सना विलंब झाला तर ७९ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.