आजादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम…

0

 

धडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

धडगांव येथील म. ज. पो. व. कला, वाणिज्य व श्री वि. कृ. कु. विज्ञान महाविद्यालयाच्या  राष्ट्रीय सेवा योजना एकक, वनस्पतीशास्र विभाग व जलसाक्षरता समिती अक्राणी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यामध्ये 100 बांबुची लागवड लकडीबारी मौजे मुंगबारी येथे करण्यात आली. यावेळी प्राचार्य डाॅ एच एम पाटील, जलसाक्षरता समितीचे भरत पावरा, जितेंद्र पावरा, अशोक पावरा, प्रा डाॅ हरिभाऊ पवार, प्रा अनिल शिंदे आदिंनी वृक्षारोपणा कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.सुनील शिंदे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा अशोक राठोड, प्रा. कल्पना साळवे व रासेयो स्वयंसेवकांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.