Saturday, January 28, 2023

रेल्वे स्थानकावर अनोळखी इसमाचा मृतदेह! ओळख पटविण्याचे आवाहन…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जळगाव रेल्वे स्थानकाजवळ आज २४/०८/२२ रोजी दुपारी ०३:५० च्या सुमारास एका अनोळखी इसमाचा बेवारस मृतदेह आढळला असून, याबाबत रेल्वे स्टेशन मास्तर एस.बी.सनस यांच्या नजरेस पडल्याने यांनी (GRPF)लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली. पण ओळख पटली नाही.

- Advertisement -

मृत अनोळखी इसमाचे अंदाजित वय ५०, वेशभूषा नेसणीस निळ्या रंगाची मळकट पँट, चेहरा लांबट, डोळे बंद, नाक सरळ, दात अर्ध पडलेले, गाल बसलेले, डोक्याचे पांढरे केस व पांढरी दाढी वाढलेली. याबाबत जळगाव लोहमार्ग पोलिसांनी सदर इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन केले असून, पुढील तपास पो.ह रामराव इंगळे करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे