रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवाळी (Diwali) सणामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यातच ऐन दिवाळीत काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द (Trains canceled)  करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.  कारण वर्धा (Wardha) आणि बडनेरा (Badnera) दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले (Wardha Railway Accident) आहेत. त्यामुळे नागपूर (Nagpur), मुंबई (Mumbai) मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे अपघात झाल्याने काल रात्रीपासूनच रेल्वे प्रशासनाने डब्यांना बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता आहे.  या अपघातामुळे दूर पल्ल्याच्या गाड्या या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या असल्याने त्यांना खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. तर आजच्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या रेल्वे गाड्या रद्द 

वर्धा : भुसावळ एक्सप्रेस

नागपूर : सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस

नागपूर : अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस

गोंदिया : कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस

नागपूर : पुणे एक्सप्रेस

अजनी : अमरावती एक्सप्रेस

Leave A Reply

Your email address will not be published.