दारूच्या नशेत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागामध्ये कारण नसतांना दारूच्या नशेत एकाला शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमा गणपत अंभोरे (वय ५९, रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शनिवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजच्या सुमारास सोमा अंभारे हे घरी असतांना शाबीर (पुर्ण नाव माहीत नाही) यासह इतर तीन अनोळखी तीन जणांनी दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी सोमा अंभोरे गेले असता चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व जीवेठार मरण्याची धमकी दिली.

याप्रकरणी सोमा अंभोरे यांनी  शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाबीर यासह इतर अनोळखी तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.