वाहन चालवतांना सावधान ! नाहीतर भरावा लागेल इतका दंड

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

वाहन चालवतांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला आता 12500 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.

मोटर व्हेइकल कायद्याच्या कलम 194C नुसार जर तुम्ही दुचाकीवरून तीन जण प्रवास करत असाल तर तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच आपात्कालिन वाहनाला रस्ता न दिल्यास 193E नुसार 10 हजार रुपयांचा दंड, तर सूर्यास्तानंतर अंधारात गाडीचा लाईट सुरू न ठेवता वाहता चालवल्यास CMVR 105/177 MVA नुसार 1500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

चालानबाबतची माहिती अशी पहा

चालानबाबतची माहिती कशी पहायची ते जाणून घेवूया. सर्वप्रथम https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. तसेच यावेळी विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि ‘Get Detail’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या गाडीवर कोणतं चालान आहे का नाही याची माहिती मिळेल.

ऑनलाइन चालन असे भरा

सर्वप्रथम https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चालानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. एक नवीन पान उघडेल. त्यावर चालानचे तपशील दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चालान शोधा. चालानासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटची कन्फर्म करा. त्यानंतर तुमचं चालान भरलं जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.