शिरागड येथील यात्रोत्सवात भाविकांची उसळली गर्दी

0

गोकुळ तायडे, मनवेल ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला गुरुवार पासुन सूरुवात झाली असून १५ एप्रिल ते १७ एप्रिलपर्यत होमहवन, पुजापाठ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे.

कोळन्हावी व शिरागड दोन्ही गावाच्या तापीनदीच्या उंच टेकडीवर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. हे दैवत “लहान गड” म्हृणून ओळखले जाते. भाविकांच्या मनोकामना पुर्ण होऊन सुख समृद्धीची देन देणारे हे दैवत आहे.

जळगाव जिल्ह्यात श्री सप्तशृंगी देवीचे लहान गड म्हणून अख्यायिका अशी आहे. शिरागड येथे दाट अरण्य होते, तापी नदीच्या काठावर शांत मनमोहक वातावरण उंच टेकड्या व दऱ्याखोऱ्यात असल्याने येथे ऋषी मुनीचे वास्तव्य होते. येथे जगाच्या हितासाठी व कल्याणासाठी जपतप, होमहवन, पुजापाठ ऋषीमुनी करीत होते, याची वार्ता राक्षस दैत्यासुराला कळाली असता त्याने येथे हाहाकार माजवला.

ऋषीमुनी देवीची आराधना केली असता श्री सप्तशृंगी देवी येथे प्रगत झाली व दैत्यासुराशी तिने युध्द केले. दैत्यासुर जीव वाचविण्यासाठी सैरावैर पळू लागला. सप्तशृंगी देवीने वायुवेगाने त्याच्या पाठलाग करून पहाड पोखरून नाशिक येथील गडावर वणी येथे या दैत्यासुराचा वध केला. याठीकाणी तिने विश्रांती घेतल्याने नाशिक येथील वणीचे गड म्हणून उदयास आले.

कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावाच्या मध्यभागी ही देवी विराजमान झाली. तेव्हापासून मोठा गड नाशिक येथील वणीचे गड व शिरागडला लहान गड म्हृणून ओळखले जाते. भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून भाविक बाराही महीने देवीच्या दर्शनासाठी येतात.

श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धामणगाव फाट्यापासून व मनवेल मार्गे शिरागड थेट गडापर्यत संस्थामार्फत रस्ता विज व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष शांताराम सांळुखे, सरपंच योगीताताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य प्रतापदादा सोनवणे, योगेश सोळंके, आण्णा सोळंके यांच्यासह गावातील विविध कार्यक्रमासाठी परीश्रम घेत आहे. साकळी पोलीस चौकीचे पोलिस कर्मचारी यांचा मार्गदर्शनाखाली चौधरी पो.पा.सुधाकर सांळुखे बंदोबस्त करून सहकार्य करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.