फडणवीसांचे ‘ते’ ट्विट एन्जॉय करतोय: शरद पवार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन प्रकरण आणि फडणवीसांनी केलेल्या १४ ट्विटबद्दल त्यांनी आज भाष्य केलं.

शिवचरित्रात जेम्स लेनने अत्यंत गलिच्छ लेखन केलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना माहिती पुरवली. त्यानंतर पुरंदरे यांनी जेम्स लेन हा चांगला लेखक असल्याचं सांगून त्याचं कौतुकही केलं. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाल्याचं शरद पवार म्हणाले.

यावेळी पवारांनी जेम्स लेनच्या पुस्तकातील उताराच वाचून दाखवला. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवजयंतीचा घातलेला घोळ आणि त्यानंतर मागितलेली माफी याचे पुरावेही पवार यांनी सादर केले. पुरंदरे यांनी जयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार या मुद्द्यावर माफी मागितली आहे. त्यामुळे हा वाद वाढवला जाऊ नये, असं पवार म्हणाले.

तसेच जेम्स लेनने शिवाजी महाराजांवर काही लिहिलं. शहाजी राजे बाहेर होते. शिवछत्रपती आणि जिजामाता शिवनेरीवर राहत होते. दादोजी कोंडदेव त्या ठिकाणी कायम असत. महाराजांच्या वडिलांची उपस्थिती तिथे नव्हती. असं गलिच्छ लिखाण जेम्स लेनने केलं. त्याबाबत पुरंदेरेंनी सोलापूरला भाषण केलं. त्यात त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं. जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक आहे, असे उद्गार पुरंदरेंनी काढलं. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. चीड निर्माण झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं.

त्यानंतर पुरंदरे यांनी शिवजयंती कधी करावी असा प्रश्न उपस्थित केला. इंग्रजी कॅलेंडर आणि तिथी याबाबत त्यांनी विधान केलं. लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुरंदरे यांनी पत्र दिलं. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार करावी असं मी सांगितलं. तसेच तिथीप्रमाणे जयंती साजरी करावी असा सल्ला मीच कालनिर्णयकारांना दिला, असं पुरंदरे यांनी या पत्रात म्हटलं आहे. कालनिर्णयकारांना मी दिलेल्या सल्ल्यामुळे शिवभक्ते संतापले. त्यांना त्रास झाला. त्यामुळे मी माफी मागतो, असं पुरंदरे यांनी पत्रात म्हटलं आहे, असं सांगत त्यामुळे आता हा वाद आपण वाढवू नये, असा सल्लाही पवारांनी दिला.

शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवाद फोफावला, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी देवेंद्र फडणवीस यांनी सलग १४ ट्वीट करत शरद पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मुस्लिमांचं लांगुलचालन आणि जातीवादाचा आरोप केला होता. यावर शरद पवार म्हणाले की, फडणवीसांचे ट्विट मी एन्जॉय करतोय, असं त्यांनी सांगितलं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.