तहसीलदारांचा थरार; केला सिनेस्टाईल अवैध वाळू नेणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गेल्या दीड महिन्यापासून दैनिक लोकशाही वृत्तपत्रात भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू हे सत्र सुरू आहे. नगरपालिका वॉटर सप्लाय विहिरी जवळ एक बंधारा बांधला जाईल इतका मोठा खड्डा जे सी. बी. द्वारा कोरून उत्खनन केलेले आहे. याचा थप्पा कुठे मारला हे सुध्दा माहिती असून त्या मारलेल्या थप्पा वर कुठलीही कारवाई नाही. साधा पंचनामा सुद्धा केला नाही.

याचे ताजे उदाहरण म्हणजे दि.17 रोजी रात्री भडगाव शहरातील पेठ भागात रात्री 11 वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जात होते. या वेळी रात्री गस्तीवर असणारे महसूल विभागाचे पथक हे त्या ट्रॅक्टर चा पाठलाग करत असतांना त्या अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वरील चालकाने गल्ली बोळाची कुठलीही पर्वा न करता ट्रॅक्टर सुसाट वेगाने चालवले. त्याच्यामागे तहसिलदार यांची  शासकीय गाडी सायरण वाजवत पाठलाग करतांना चा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्व दूर फिरत आहे. या नंतर ते ट्रॅक्टर कुठे गेले? व त्याचे काय झाले? हे अद्याप कळू शकते नाही. असा रेती चोर व महसूल चा खेळ बंद नाही झाला तर भविष्यात सुसाट चालणारे ट्रॅक्टर हे सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतेल. यावर तहसीलदारांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.