महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी बसले भूकंपाचे धक्के

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याला बुधवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. ३.४ रिश्टर स्केलचे हादरे बसल्याचे सांगण्यात आले. धानीवरी येथील शेतकरी शकणार गोरखना यांच्या घराच्या भिंती मागील भूकंपात भेगा पडल्या होत्या. आजच्या भूकंपात ती भिंत कोसळून नुकसान झाले. गेले. काही महिने भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते. मात्र नवीन वर्षात पुन्हा भूकंप जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

डहाणू, तलासरी, धुंदलवाडी, जव्हार या भागांत हे धक्के जाणवले. आज दुपारी १.४७ वाजता ३.४ रिश्टर स्केलचा हादरा बसला. डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख यांनी माहिती दिली की, या धक्क्यांमुळे अजून मोठ्या प्रमाणात नुकसान, हानीची माहिती समोर आली नाही. महसूल अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.