प्रियकरासोबत नवीन वर्षाची पार्टी केली, आणि नंतर घडले असे काही….

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

झारखंडमध्ये एक खळबळजन घटना घडली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच तेथे एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. आदल्या रात्रीच तिने बॉयफ्रेंडसोबत नवीन वर्षाची पार्टी केली. पण सकाळी मात्र बेडखाली तिची डेडबॉडी सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणात त्या तरुणीच्या बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप लावण्यात आला असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

रिपोर्टपासून, दुमका येथील काठीकुंडच्या चंद्रपूरा येथे ३३ वर्षांची ही तरुणी बांधपाडा भागात एका घरात भाड्याने राहत होती. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ती बॉयफ्रेंड चीकूसोबत पार्टी करत होती. पण सकाळी एकच कल्लोळ माजला. कारण त्या तरूणीचा मृतदेह बेडच्याखाली सापडला. त्या तरुणीच्या मैत्रिणीने तिला बेडखाली पडलेलं पाहिल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडला जाब विचारला. तेव्हा तो म्हणाला की रात्री (मद्यपान) जास्त झाल्याने तिची तब्येत खराब झाली आहे. त्यामुळेच ती अशी पडली आहे. त्यानंतर तो तिथून निघून गेला.

मैत्रिणीने उठवायचा केला प्रयत्न

त्यानंतर त्या मैत्रिणीने तिला हलवलं, उठवायचा प्रयत्न केला. पण त्या तरुणीने काहीच हालचाल केली नाही. तिचा मृत्यू झाला होता. हे पाहून तिची मैत्रीण घाबरली. तिने लगेचच तिच्या कुटुंबियांना फोन केला तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. या घटनेसंदर्भात समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीमसह त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांना त्या रूममधून मद्याचा ग्लास जप्त केला. तसेच अनेक फिंगरप्रिंट्सही घेतले.

मैत्रिणीचं म्हणणं काय ?

मृता तरूणीच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, तिचा प्रियकर रात्री नववर्षाच्या पार्टीसाठी विद्यार्थिनीसोबत आला होता. याआधी दोन तरुण तेथे पार्टी करत होते, मात्र चिकू येताच ते निघून गेले. यानंतर मृत तरूणी आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यात वादावादी झाली. तिचा बॉयफ्रेंड चिकूने, तिला मारहाणही केली. सकाळी उठले आणि पाहिलं तर काय तिचा मृतदेह बेडखाली सापडला. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनीही हत्येचा संशय व्यक्त केला असून पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.