ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, रेव्ह पार्टीतून १०० जण ताब्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाण्यातून नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच १०० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठाण्यात घोडबंदर कासारवडवली गावाजवळ १०० लोक रेव्ह पार्टी करत होते. ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्य्क शिवराज पाटील, एसपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांनी ही संयुक्त कारवाई केली. या रेव्ह पार्टीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. या पार्टीत चरस, गांजा, दारू, एमडी अशी अनेक नशा उपलब्ध करून देण्यात आल्या होती. याशिवाय कासारवडवलीजवळील रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून पोलिसांनी २५ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

घोडबंदर इथल्या कासारवडवली भागात एका प्लॉटवर रेव्ह पार्टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्यरात्रीच्या सुमारास युनिट पाचच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री पार्टी सुरु झाल्यानंतर पोलिसांच्या प्रक्रिया
कासारवडवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.

रेव्ह पार्टी करत असतांना पडलेल्यांमध्ये पाच मुलींचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद होऊन पार्टीमध्ये सामील झाले होते. पार्टीमध्ये नशा करण्यासाठी करण्यासाठी एलएसडी, चरस, गांजा सोबत त्याला वापरणारे चिलम, अल्कोहोल असे अमली पदार्थ पुरविण्यात आले हिते. दोन तरुणांनी या रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. ही दोन्ही मुलं कळवा आणि डोंबिवली येथे राहत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी पंचनामा करुन वैद्यकीय चाचणीसाठी तरुणांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.