चोपड्यात आढळले कोरोनाचे २ रुग्ण आढळले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील दोन महिला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्या असता त्यांना सर्दी, खोकला ही लक्षणे दिसून आल्याने त्यांची ‘कोरोना’ टेस्ट केली असता ते रॅपिड टेस्टमध्ये ‘पॉसिटीव्ह’ निघाले. यामुळे दोन संशयित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती डॉ. सागर पाटील यांनी दिली. शहरातील या दोन्ही महिलांची रॅपिड टेस्ट ‘पॉझिटिव्ह’ आली असून, ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी त्यांचे नमुने जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

शहरातील दोन रुग्ण संशयित सापडले असले तरी कोरोना विषाणूचा हा नवीन उपप्रकार ‘जेएन- १’ आहे की नाही, याची स्पष्टता होण्यास वेळ लागणार आहे. संबंधित महिलेचे नमुने तपासणीसाठी जळगाव प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, सौम्य लक्षणे दिसत आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हल सामान्य आहे.

राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार ‘जेएन-१’चे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील दोन्ही महिलांना सर्दी, ताप, खोकला जाणवत असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची रॅपिड चाचणी केली होती. या चाचणीत ते ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

काळजी घेण्याचे आवाहन
डॉक्टरांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढले असून, सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्येसुद्धा वाढ झाली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गेल्यास अशा ठिकाणी ‘मास्क’चा वापर करावा. घाबरण्याचे कारण नाही, पण काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. सागर पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.