जम्मू-काश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुर्रियतवर केंद्र सरकारने घातली बंदी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जम्मू काश्मीरला दहशतवाद मुक्त कारण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यादरम्यान मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर च्या नंतर सरकारने आता तहरीक-ए-हुर्रियत वर देखील बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल माहिती दिली असून, त्यांनी दहशतवादी कारवायांमुळे या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, ही संघटना जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं कारण्यासाटःई आणि इस्लामिक शासन स्थापू कारण्यासाठी अवैध कारवायांमध्ये गुंतली होती. हा गट जम्मू-काश्मीर मध्ये फुटीरतावाद वाढवण्यासाठी भारत विरोधी प्रचार आणि दहशतवादी कारवाया करत आला आहे. दहशतवादाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झीरो टॉलरंस पॉलिसीअंतर्गत भारत विरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचे प्रयत्न हाणून पाडले जातील.

यापूर्वी २७ डिसेंबरला गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग काश्मीर(मसरत आलम ग्रुप) वर बंदी घातली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते की, देशविरोधी कारवाया केल्याने या संघटनेवर UAPA अंतर्गत ५ वर्षांची बंदी घातल्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.