राज्यात थंडीचा कडाका वाढणार ; पावसाचीही शक्यता

0

मुंबई ;- येत्या काही दिवसांत राज्यात गारठा वाढणार आहे. तसेच राज्यात पुढील 24 तासांतपावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 13 डिसेंबरपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आह. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील हवामान मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्णपणे बदललं होतं. पण आता पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने थंडीचा जोर वाढत आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पारा घसरेल आणि काही ठिकाणी थंडी वाढू शकते. येत्या 5 ते 6 दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या अंतर्गत भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रात्री जास्त थंड राहतील.

या भागात होईल पाऊस

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी, काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात पावसाचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.