बॉसने Whatsapp ग्रुपमधून काढले, म्हणून संतप्त कर्मचाऱ्याने बॉसला बांबुनेच चोपले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तंत्रज्ञानाचा वापर जास्त वाढल्यामुळे जसे फायदे आहे. त्याचप्रमाणे तोटेसुद्धा आहे. लोकांची पेशन्स लेव्हल कमी होऊन इरिटेशन वाढलं आहे. त्यामुळे कोणीही काहीही करत आहे. याचा राग मनात घेऊन पुण्यात एक भयानक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पुणे जिल्ह्यात कंपनीचा कर्मचारी आणि बॉस यांच्यात एक विचित्र घटना समोर आली आहे.

बॉसने कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने कर्मचारी दुखावला आणि त्याने तो राग मनात धरत रागाच्या भरात ऑफीसमधील सर्व कर्मचाऱ्यांसमोरच बॉसला काठीने चोपले. एवढचं नव्हे तर त्या संतप्त कर्मचाऱ्याने कार्यालयाची तोडफोड करत बॉसचा आयफोनही फोडला. ही संपूर्ण घटना पुण्यातील चंदन नगर येथील मुंडवा रोड जवळील एका कंपनीत घडली.

नेमकं काय घडलं त्या दिवशी ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्यम हा इंस्टा गो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करतो. मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांशी त्याची वागणूक योग्य नव्हती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात बॉस अमोल यांच्याकडे तक्रार केली होती. याचसंदर्भात बोलण्यासाठी आणि स्पष्टीकरण मागण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे सत्यम याला अनेकदा कॉल करण्याचा, त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.पण त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. यामुळे अखेर बॉस अमोल ढोबळे याने सत्यमला कंपनीच्या Whatsapp ग्रुपमधून काढले. त्यामुळे सत्यमला राग अनावर झाला. Whatsapp ग्रुपमधून का काढलं ? याचा जाब अमोलला विचारला. त्यानंतर संपतापाच्या भरात त्याने सर्व कर्मचाऱ्यांसोमोर बांबू घेऊन अमोलला मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर ढोबळेंनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सिंघवीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात चंदन नगर पोलिस स्टेशनमधील अधिकारी पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.