यशस्वी विध्यार्थ्यामुळेच महाविद्यालयाचे नाव मोठे होते : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

खानदेशातील जी. एच. रायसोनी महाविध्यालय हे पहिलेच मॅनेजमेट व अभियांत्रिकी क्षेत्रातील ऑटोनॉमस महाविध्यालय असून नॅककडून रायसोनी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला. नॅक “ए” ग्रेडनेही आपले इस्टीट्यूट सन्मानित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भागातील विध्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असे, प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयातील ‘नॉस्टेलजिया-२०२३’ या कार्यक्रमांतर्गत मॅनेजमेट व अभियांत्रिकी या शाखेतील पदवी व पदव्युत्तर शाखेतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात केले. याप्रसंगी सुरुवातीला दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थित माजी विध्यार्थ्यांचे स्वागत करत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध यशस्वी कार्याची माहिती दिली. एल्यूमनी फाउंडेशन समन्वयक व प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा.तन्मय भाले व प्रा. मनीष महाले यांनी जी. एच. रायसोनी एल्यूमनी फाउंडेशनच्या विविध कार्यावर प्रकाश टाकत माजी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एल्यूमनी फाउंडेशन विविध कार्यक्रम राबवीत असल्याचे सांगितले. यावेळी या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रफिक शेख, प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. मनीष महाले व सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच प्राध्यापक उपस्थित होते.

माजी विध्यार्थ्यानी व्यक्त केल्या भावना
मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपले महाविध्यालय आता कसे आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होते. वर्ग मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी काहींनी महाविध्यालयात मिळालेले शिक्षण व प्राध्यापकांनी दिलेले मूलमंत्र आपल्या जीवनात किती उपयोगी येत आहेत, याचे सकारात्मक अनुभव कथन केले. तसेच यश लढढा, पियुष पाटील, कुणाल पाटील या माजी विध्यार्थ्यानी रायसोनी मंडी, नेटवर्क लंच, पिनेकल या सारख्या उपक्रमातून आमचा सर्वांगीण विकास होऊ शकला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.