टाटा समूहाचा मोठा विक्रम, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

टाटा समूहाने संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार,टाटा समूहाचे मार्केट कॅप ३६५ अब्ज डॉलर किंवा ३०.३० लाख कोटी रुपये आहे. IMF च्या अहवालानुसार, पाकिस्तानचा GDP ३४१ अब्ज डॉलर आहे. म्हणजे एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे.

भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आकार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत जवळपास अर्थव्यवस्थेत जवळपास निम्मा आहे. TCS चे मार्केट कॅप १७० डॉलर आहे. गेल्या वर्षभरात टायटन, आणि टाटा पॉवरमध्ये झालेल्या वाढीमुळे टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात टाटा कंपन्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे.

टाटा समूहातील कंपन्यांमध्ये TRF,  ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्टसन इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे. याशिवाय टाटा कॅपिटल, जो पुढील वर्षी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे, त्याचे मार्केट कॅप २.७ लाख कोटी रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.