झोपडीला लागलेल्या आगीत बहीण आणि भावाचा होरपळून मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळे तालुक्यातील लोणखेडी गावातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे झोपडीला अचानक लागलेल्या आगीत ७ वर्षांच्या बालकासह त्याच्या ४ वर्षीय बहिणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. अमोल पवार (वय ७) आणि टीना नाना पवार (वय ४) अशी मृत भावंडांची नवे आहेत. आपल्या नातवंडांना वाचवण्याचे आजीने भरपूर प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. समोरच नातवंडांचा अंत पाहून आजीने टाहो फोडला. आगीचे कारण अजून समोर आले नाही.

अमोल आणि टीना हे भाऊ-बहीण खेळात होते. आजी सताबाई या गुरांना पाणी पाजण्यासाठी गेल्या असतांना झोपडीला आग लागल्याचे दिसून आले, आगीला पाहताच सताबाई भाब्रुल्या आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. लोणखेडी (ता.धुळे) गावात नाना पवार हे परिवारासोबत राहत होते. शेतीकामासाठी हे परिवार बाहेर गेला होता. त्यावेळेस झोपडीत सताबाई यांची आरडाओरड ऐकून परिसरात क्रिकेट खेळणारी मुले आगीच्या ठिकाणी धावत आली, परंतु आग विझवण्यास उशीर झाल्याने झोपडी जाळून खाक झाली.

आगीच्या ढीगाऱ्या खाली अमोल आणि टीना यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आगीमुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. संजयकुमार खिची यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.