तामिळनाडूमध्ये सरकारी कर्मचाऱ्याकडून 20 लाखांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला अटक

0

मदुराई ;- सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना अंमलबजावणी संचलनालयाच्या ( ईडी ) अधिकाऱ्याला अटक केली आहे. २० लाख रूपयांची लाच घेताना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ई गवडीच्या अधिकाऱ्याला अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंकित तिवारी असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव आहे. अंकितला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंकित तिवारीच्या अटकेनंतर जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मदुराई येथील ईडीच्या कार्यालयात झाडाझडती घेतली. तसेच, तिवारीच्या निवासस्थानाचीही तपासणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.