कार खांबावर धडकून झालेल्या अपघातात महिला ठार ; तीन जण जखमी

0

जळगाव ;-नाशिक येथून पतीवर उपचार करून रावेर गावी परतत असताना खांबावर कार धडकून झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना नशिराबाद टोल नाक्या नजीक आज पहाटे घडली.

सावित्री सुनील हसकर (५०, रा. रावेर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रावेर येथे पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर (रा. रावेर) यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. त्यासाठी ते अधून-मधून तेथे जात असतात. शुक्रवारी उपचार घेऊन रात्री नाशिक येथून रावेर येथे ते कारने परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सावित्री हसकर, अन्य एक महिला व मित्र होते. कार नशिराबाद टोल नाक्याजवळ आली असता ती एका खांबावर धडकली. या अपघातात सावित्री हसकर या जागीच ठार झाल्या. तसेच चालकाचा हात व पाय फ्रॅक्चर झाला आहे तर अन्य दोघांनाही मार लागला .मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.