मेडिकलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आले अचानक ७५३ कोटी !

0

नवी दिल्ली ;- तामीळीनाडूमध्ये चैन्नई येथे एका मेडिकलवर काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात अचानक ७५३ कोटी रुपये ट्रान्स्फर झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून तो तरुण बँकेत गेला असता त्याच्या खात्याला सिज केल्याने त्याला चांगलाच धक्का बसला . मात्र बँकेच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला.

करणकोविल येथील रहिवासी असलेला मुहम्मद इद्रिस, तेनामापेठ येथील एका मेडिकल दुकानात काम करतो. 7 ऑक्टोबर रोजी त्याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीला 2000 रुपये पाठवले होते. यानंतर इद्रिसने बॅंक बॅलन्स तपासण्यासाठी एसएमएस ओपन केला, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता.

यानंतर इद्रिसने कोटक महिंद्रा बँकेची शाखा गाठली. तिथे गेल्यावर त्याला समजले की, तांत्रिक बिघाडामुळे एवडी मोठी रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे. तसेच, बँकेकडून त्याचे अकाउंट सीज करण्यात आले. दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, एसएमएस मेसेजिंगमधील त्रुटीमुळे ही घटना घडली. खात्यात पैसे गेल्याचा मेसेज दिसत आहे, प्रत्यक्षात खात्यात पैसे ट्रांसफर झालेच नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.