तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव ;- हातात तलवार घेवून वाल्मिक नगर परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला शनीपेठ पोलीसांनी कारवाई करत लोखंडी तलवारीसह अटक केली आहे. त्यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बाबूराव तायडे रा. वाल्मिक नगर,असे संशयित आरोपीचे नाव आहे.

बेकायदेशीरपणे हातात लोखंडी तलवार घेवून वाल्मिक नगरात सोमवारी रात्री विजय तायडे हा फिरत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने तात्काळ वाल्मिक नगरात जावून संशयित आरोपी विजय तायडे याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.

ही कारवाई शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय खैरे, पो.कॉ. राहूल पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, मुकुंद गंगावणे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.