जलतरण तलाव मृत्यूप्रकरणी ठेकेदार,व्यवस्थापक सह जीवरक्षकासह ४ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

१८ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावात २३ वर्षीय तरुण सलमान शकील बागवान याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी दिनांक २२ जून रोजी दुपारी २ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा रजिस्टर क्र २४२-२३ भारतीय दंड विधान कायदा ३०४ “अ” प्रमाणे चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा देशमुख या करीत आहे.

भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासना विरुद्ध कारवाई करावी

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या या जलतरण तलावात आतापावेतो तीन तरुण मृत्युमुखी पडले असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव फारुख शेख यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे, क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांना ९ मुद्द्यांबाबत तक्रार सादर केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने या सदोष मनुष्य वधात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची सुध्दा चौकशी होणे आवश्यक आहे कारण क्रीडा कार्यालयाने वेळीच आपली कामगिरी पार न पाडल्याने हा तिसरा तरुण मेलेला आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी फारूक शेख यांनी केलेली आहे.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा

ठेकेदार तथा व्यवस्थापक राहुल विजय सूर्यवंशी, जीव रक्षक सुनील चौधरी, पंकज पवार व यादव महाले यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपासात अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.