अजबच.. नदीमध्ये पाण्यासोबत सोनंही वाहतं; कमाईचं साधन ठरतेय ‘ही’ नदी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

निसर्गातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघडकीस येत असतात. अशीच एक अजब गोष्ट समोर आलीय. भारत देश विविधतेने नटलेला आहे. भारताला निसर्गाने अनेक देणग्या दिल्या आहेत. भारतात ४०० हून अधिक छोट्या – मोठ्या नदी वाहतात. देशात वाहणाऱ्या नद्यांच खूप वेगळेपण आहे. मात्र आज आपण अशा नदीबद्दल आपण एक अजब गोष्ट वाचणार आहोत.

नदीत पाण्यासोबत सोन्याचाही प्रवाह वाहतो. हे वाचून थक्क झालेत ना.. हो पण हे खरं आहे. शेकडो वर्षांपासून तज्ज्ञ या नदीतून पाण्यासोबत सोनं कसं वाहतं? या प्रश्नाच्या शोधात आहे.

झारखंडमध्ये वाहणारी स्वर्णरेखा नदीमध्ये पाण्यासोबत सोनं देखील वाहत आहे. म्हणून या नदीला स्वर्णरेखा नदी म्हणून ओळखलं जातं. झारखंडमध्ये एक जागा अशी आहे. जेथे स्थानिक आदिवासी लोक या नदीत सकाळी जातात. दिवसभर चाळणीच्या मदतीने सोने एकत्र करतात. या कामात अनेक पिढ्या लागल्या आहेत.

ही स्वर्णरेखा नदी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा जिल्ह्यातून वाहते. या नदीचा उगम झारखंडच्या रांची शहरापासून जवळपास १६ किमी दूर होतो. महत्वाचं म्हणजे ही नही मधल्या कोणत्याही प्रवाहाला भेटत नाही. ती सरळ बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.

मीडिया रिपोर्टनुसार, येथे संशोधन केलेल्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही नदी अनेक डोंगर रांगांमधून येते. यामुळेच या प्रवाहात सोन्याचे कण दिसतात. मात्र अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही.

स्वर्णरेखासोबत वाहणारी नदी ‘करकरी’. या नदीच्या प्रवाहातही सोन्याचे कणही भेटतात. काही लोकांना असं वाटतं की, स्वर्णरेखा नदीत सापडणारे सोने हे करकरी नदीतून वाहत येतात.

नदीच्या प्रवाहातील रेती काढून सोनं एकत्र करणं हे काही सोपं काम नाही. आदिवासी कुटुंबातील लोकं दिवसभर पाण्यात उभं राहून सोन्याचे कण शोधतात. दिवसभर थांबल्यानंतर एका व्यक्तीला एक ते दोन कण सोनं सापडतं. त्याला विकून ८० ते १०० रुपये मिळतात. एक व्यक्ती महिन्याभरात ५ ते ८ हजार रुपये कमावतो.

Leave A Reply

Your email address will not be published.