मुक्ताईनगर येथे महिलांचा राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर येथे सेवादल काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ऐश्वरी राठोड आणि सेवादल तालुका अध्यक्ष सुमन चौधरी यांच्यावतीने योग्य कार्यप्रणालीला काँग्रेस पक्षामध्ये बघितल्यानंतर मुक्ताईनगरच्या २५ ते ४० महिलांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी खासदार उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, अनिल भोई, संजय चौधरी, डॉ. जगदीश पाटील, जामनेर तालुका्ध्यक्ष शरद पाटील, मुलचंद नाईक, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुसा पिंजारी, गणेश झाल्टे, इंडियन टेलर, रवींद्र जाधव, कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये सुनिता पाटील, संगीता काळे, सुजाता रामटेके, वैशाली खैरनार, अनिता कोळी, वर्षा भोई व इतर महिलांनी तसेच महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

या प्रवेश सेवा दलामध्ये महिलांनी जे कार्य हाती घेतले असून प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षासाठी झटणाऱ्या कार्याला बघून प्रवेश आज झाला. नुतन प्रवेश करणार्‍या महिलांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पुढील काळामध्ये काँग्रेस परिवारातर्फे सर्व महिलांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.