सैनिकाची गळफास लावून आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नागपूर : येथे कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने कामठी-कन्हान मार्गालगत असलेल्या ऑफिसर मेस परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.

विवेककुमार अखिलेश राय (२७, रा. संत कबीरनगर, बोरबायस, उत्तर प्रदेश) असे मृत सैनिकाचे नाव आहे. ताे कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील कॅन्टाेन्मेंट क्रमांक ४१४ मध्ये सहा महिन्यांपूर्वी रुजू झाला हाेता.

दरम्यान, रविववारी सकाळी याच प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील ऑफिसर मेसच्या जवळ असलेल्या कडुनिंबाच्या झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने नाॅयलाॅन दाेरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून आल्याने इतर सैनिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

ही प्रक्रिया आटाेपल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येचे मूळ कारण मात्र कळू शकले नाही. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.